धार्मिक

शिरूरला मंगळवार दि.२४ पासून श्री शिव महापुराण कथा आयोजन ; आयोजक उद्योगपती व पी.आर.फाऊंडेशनचे प्रकाशभाऊ धारीवाल व उद्योजक आदित्य धारीवाल यांनी सर्व भाविक भक्तांना सहपरिवार उपस्थित राहून लाभ घेण्याचे केले आवाहन


शिरूरला मंगळवार दि.२४ पासून श्री शिव महापुराण कथा आयोजन ; आयोजक उद्योगपती व पी.आर.फाऊंडेशनचे प्रकाशभाऊ धारीवाल व युवा उद्योजक आदित्य धारीवाल यांनी सर्व भाविक भक्तांना सहपरिवार उपस्थित राहून लाभ घेण्याचे केले आवाहन

शिरूर प्रतिनिधी

शिरूर,ता.शिरुर,जि.पुणे येथे दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ ते २ मार्च दरम्यान भव्य”श्री शिव महापुराण कथा” आयोजन करण्यात आले असून, या धार्मिक पर्वात शिवभक्तांनी सहभागी होऊन शिव महापुराण कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन उद्योगपती प्रकाशभाऊ धारीवाल व युवा उद्योजक आदित्य धारीवाल यांनी आयोजित पत्रकार परिषदेवेळी केले. 

यावेळी आयोजक प्रसिद्ध उद्योगपती व पी.आर फाऊंडेशनचे प्रकाशभाऊ धारीवाल,युवा उद्योजक आदित्य धारीवाल,माजी नगरसेवक विजय दुगड,नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे,उपनगराध्यक्ष मितेश गादिया,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचर्णे,जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे,माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक रविंद्र ढोबळे,माजी सरपंच अरुण घावटे,विठ्ठल घावटे यांसह आजी माजी नगरसेवक व मान्यवर उपस्थीत होते.

       श्री शिव महापुराण कथा कार्यक्रम उद्योगपती स्वरसिकलाल धारिवाल नगरी रामलिंग रोड,शिरुर जिल्हा पुणे येथे मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ ते सोमवार दिनांक २ मार्च २६ या कालावधीत दुपारी एक ते सायंकाळी चार या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.या पवित्र कथावाचनाचा शुभयोग आंतरराष्ट्रीय कथा वाचक प.पू.पंडित प्रदीपजी मिश्रा (सिहोर वासी) यांच्या अमृतवाणीतून लाभणार आहे.

      कार्यक्रमाचे आयोजन पी.आर.धारिवाल फाउंडेशन उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल व युवा उद्योजक आदित्य धारिवाल व धारीवाल परीवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.

     या श्री शिव महापुराण कथेचा लाभ सर्व भाविक भक्तांनी सहपरीवार उपस्थित राहून घ्यावा असे आवाहन माजी नगरसेवक,पी.आर.फाऊंडेशन व आयोजकांनी केले आहे.


शिरूर दर्शन

मुख्य संपादक : शिरूर दर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *