शिरूरला डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन
शिरूरला डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

शिरूर । प्रतिनिधी
राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीच्यावतीने शिरूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन शनिवार ११ ते मंगळवार दि.१४ एप्रिल रोजीपर्यंत करण्यात आले असुन नागरीकांनी लाभ घेण्याचे आवाहन उत्सव समितीचे अध्यक्ष रामभाऊ झेंडे व सचिव प्रमोद गायकवाड यांनी केले.
मंगळवार दि.१४ रोजी सकाळी १० वा.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीच्यावतीने येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात दि.११ ते दि.१४ रोजी संध्याकाळी ७ वाजता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवार दि.११ रोजी सिध्दार्थ मोरे यांचे “मी जोतीराव फुले बोलतोय” नाटक रविवार दि.१२ रोजी प्रा.श्रीकांत बरींगे यांचे “शिवराय ते भिमराव” व्याख्यान सोमवार दि.१३ रोजी सुमित गुणवंत व सहावी यांचे कवि संमेलन मंगळवार दि.१४ रोजी संकल्प गोळे यांचा भीम गीतांचा भव्य कार्यक्रमांचे तसेच भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रामभाऊ झेंडे व सचिव प्रमोद गायकवाड यांनी सांगितले.

मुख्य संपादक : शिरूर दर्शन
