राजकीय

शिरूरला नगराध्यक्षपदासाठी पाच तर नगरसेवक पदासाठी ९९ उमेदवार 


शिरूरला नगराध्यक्षपदासाठी पाच तर नगरसेवक पदासाठी ९९ उमेदवार

शिरूर प्रतिनिधी

शिरूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी पाच तर एकुण २४ नगरसेवकपदाच्या जागांसाठी ९९ उमेदवार रिंगणात आहेत.यामध्ये विविध राजकीय पक्षांसह अपक्षांचा समावेश असून पंचरंगी  सामना होण्याची शक्यता आहे.
नगराध्यक्षपदाकरता माजी नगरसेविका मनीषा कालेवार यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला त्यांच्या माघारीमुळे आता ही लढत पंचरंगी लढत होणार आहे.चार राजकीय पक्षाचे उमेदवार व माजी नगराध्यक्ष वैशाली वाखारे या अपक्ष म्हणून मैदानात राहणार आहेत .
वेताळ परीसा स्वप्निल,ज्योती नवनाथ जाधव प्रभाग एक अ मधुन व एक ब मधुन कुर्लप गणेश चंद्रकांत या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.प्रभाग क्रमांक दोन अ मधून पूजा अमित शिर्के तर प्रभाग क्रमांक दोन ब मधून माजी नगरसेवक आबीद शेख व सामाजिक कार्यकर्ते फुलडाळे प्रितेश यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.प्रभाग क्रमांक तीन मधून कोणीही अर्ज मागे घेतले नाहीत.प्रभाग क्रमांक चार अ मधील उमेदवार ऐश्वर्या साखला व चार ब मधील माजी नगरसेवक उमेश भोसले व आशिष चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला तर प्रभाग क्रमांक पाच अ मध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या माजी नगराध्यक्ष सुवर्णा लटांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. आज प्रभाग क्रमांक पाच ब मध्ये मोठ्या राजकीय घडामोडी झाल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार आशिष शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अभिजीत पाचर्णे या दोन्ही उमेदवारांनी आपापल्या पक्षाकडून दाखल केलेल्या उमेदवारी अर्ज मागे घेतले उमेदवारी जाहीर करून या दोन्ही उमेदवाराने घेतलेल्या माघारीमुळे चर्चांना वेग आला असून येथे आता हे दोन्ही पक्ष कोणत्या उमेदवाराला पुरस्कृत करणार याकडे लक्ष लागले आहे.

प्रभाग क्रमांक सहा ब मधून विजय गुजर, जनता दल(धर्मनिरपेक्ष) चे  वसंत बेंद्रे,यादव नितीन व सातारकर सागर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.प्रभाग क्रमांक सात अ मधून शिक्षण मंडळाचे माजी सभापती संतोष शितोळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.प्रभाग क्रमांक आठ अ मधून वृषाली नवले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला तर प्रभाग क्रमांक नऊ अ मधून जगताप राकेश यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला तर प्रभाग क्रमांक नऊ ब मधून माजी नगरसेविका माया गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला तर प्रभाग क्रमांक दहा अ मधून मधु शिशुपाल व अश्विनी शिशुपाल या दोघांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. प्रभाग क्रमांक ११ अ मधून माजी नगरसेविका कविता वाटमारे व नंदा जाधव यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. प्रभाग क्रमांक ११ ब मधून तुषार घावटे व शिंदे गट शिवसेनेचे उमेदवार माजी नगरसेवक बाफना सुनील यांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे.प्रभाग क्रमांक १२ अ मधून राहुल दसगुडे,महेंद्र पाचर्णे व शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिजीत आंबेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असून बारा ब मधून बांडे सविता यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.


शिरूर दर्शन

मुख्य संपादक : शिरूर दर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *