शिरूर नगरपरिषद विषय समित्यांची निवड स्थायी समिती सभापतीपदी नगराध्यक्ष पाचर्णे,बांधकाम समिती सभापती जाधव,पाणी पुरवठा सभापती पोटे, स्वच्छता समिती सभापती बागवान,नियोजन व विकास समिती सभापती साठे,शिक्षण समिती सभापती उपनगराध्यक्ष गादिया तर महिला बालकल्याण समिती सभापती सय्यद व उपसभापती जामदार
स्थायी समिती सभापतीपदी नगराध्यक्ष पाचर्णे,बांधकाम समिती सभापती जाधव,पाणी पुरवठा सभापती पोटे, स्वच्छता समिती सभापती बागवान,नियोजन व विकास समिती सभापती साठे,शिक्षण समिती सभापती उपनगराध्यक्ष गादिया तर महिला बालकल्याण समिती सभापती सय्यद व उपसभापती जामदार
शिरूर प्रतिनिधी
शिरूर नगरपरीषदेच्या विषय समितीपदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार दि.२३ रोजी रसिकभाऊ धारीवाल सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पिठासन अधिकारी तथा मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी विषय समित्याच्या सभापती व सदस्यांची निवड जाहिर केली.
यावेळी नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्ण, उपनगराध्यक्ष मितेश गादिया व नगरसेवक,नगरसेविका उपस्थित होत्या.
शिरूर नगरपरीषद विषय समितीचे सभापती व सदस्य पुढील प्रमाणे –
स्थायी समिती
ऐश्वर्या पाचर्णे-सभापती
मितेश प्रदीप गादिया, सदस्य तथा पदसिद्ध सभापती, शिक्षण समिती
सुनिल सुनिल-सदस्य तथा सभापती, सार्वजनिक बांधकाम समिती
एजाज बागवान -सदस्य तथा सभापती, स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती
सुनिता पोटे – सदस्य तथा सभापती, पाणीपुरवठा, जलनिस्सारण व विद्युत समिती
स्वाती साठे-सदस्य तथा सभापती, नियोजन व विकास गृहनिर्माण, टपरी व झोपडपट्टी पुनर्वसन समिती
आयेशा सय्यद – सदस्य तथा सभापती, महिला व बालकल्याण समिती