
जेएसपीएम भिवराबाई सावंत पॉलिटेक्निक, वाघोली पुणे येथे महाराष्ट्र राज्य डी१ विभागीय क्रिकेट सामन्यांचे यशस्वी आयोजन केले.
शिरूर प्रतिनिधी
जेएसपीएम भिवराबाई सावंत पॉलिटेक्निक, वाघोली पुणे
यांनी १९ जानेवारी २०२६ ते २१ जानेवारी २०२६ दरम्यान आंतर अभियांत्रिकी डिप्लोमा विद्यार्थी क्रीडा संघटना ( आयईडीएसएसए) महाराष्ट्र राज्य डी१ विभागीय क्रिकेट सामन्यांचे यशस्वी आयोजन केले.
या स्पर्धेत एकूण १४ संस्थांनी सहभाग घेऊन खेळाप्रती आपला उत्साह, आवड आणि ऊर्जा दाखवली.
जयहिंद पॉलिटेक्निकने अंतिम सामन्यात पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निकला १३ धावांनी पराभूत करून विजेतेपदाच्या चषकावर आपले नाव कोरले.
चेंडूवरील सर्व सामने जेएसपीएम क्रिकेट ग्राउंड, वाघोली येथील भव्य, सुंदर आणि हिरव्यागार मैदानावर खेळले गेले.उत्कृष्ट नियोजन आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सदर स्पर्धा पार पडली.या स्पर्धेसाठी जे एस पी एम चे संस्थापक सचिव मा.मंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांनी शुभेच्छा दिल्या.
स्पर्धा उद्घाटन कार्यक्रम आणि बक्षीस वितरण समारंभ वाघोली कॅम्पसचे संचालक डॉ.बुगडे सर,सहाय्यक संचालक डॉ.वाकचौरे सर,बीएसएपी वाघोलीचे प्राचार्य डॉ.पी.टी.काळे , डीन डॉ.दाभाडे मॅडम आणि विभागप्रमुख डॉ.यादव सर,भुतेकर सर,पोखरकर सर, प्रा. गायकवाड मॅडम, प्रा काश्मिरे मॅडम, शिंदे सर, क्रीडा प्रभारी राहुल डावखर सर आणि संघाचे सदस्य अतुल कवठे, जावेद शेख, महेश वाघमोडे, सुशांत हेतकळे, आविष्कार शिंदे, गौरव कांबळे आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडला.

मुख्य संपादक : शिरूर दर्शन
