शैक्षणीक

जे.एस.पी.एम.च्या भिवराबाई सावंत पॉलिटेक्निक वाघोली येथील विद्यार्थ्यांची प्रेसिजन इन्स्ट्रुमेंट्स सर्व्हिस प्रा.लि.मध्ये यशस्वी नियुक्ती


*जे एस. पी. एम. च्या भिवराबाई सावंत पॉलिटेक्निक, वाघोली येथील विद्यार्थ्यांची प्रेसिजन इन्स्ट्रुमेंट्स सर्व्हिस प्रा. लि. मध्ये यशस्वी नियुक्ती*

वाघोली : येथील जे एस. पी. एम. च्या भिवराबाई सावंत पॉलिटेक्निक, संस्थेच्या इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलीकम्युनिकेशन शिक्षण विभागातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी कॅम्पस प्लेसमेंटद्वारे उल्लेखनीय यश संपादन केले आहे. प्रेसिजन इन्स्ट्रुमेंट्स सर्व्हिस प्रा. लि. या नामांकित कंपनीत विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यांना वार्षिक २.७६ लाख रुपये पॅकेज मिळाले आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अभिषेक पठारे, विश्वनाथ कदम, ऋषिकेश नागरे व कुणाल काळे यांचा समावेश आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, तांत्रिक कौशल्ये आणि कॅम्पस प्लेसमेंट सेलच्या योग्य मार्गदर्शनामुळे हे यश प्राप्त झाले असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

या निमित्ताने संस्थेत विद्यार्थ्यांचा गौरव व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास संकुल संचालक डॉ. व्ही. ए. बुगडे, सहाय्यक संचालक श्री. एस. के. वाकचौरे, प्राचार्य डॉ. पी. टी. काळे, डीन डॉ. व्ही. एस. दाभाडे, विभागप्रमुख श्री. एन. ई. भुतेकर तसेच प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी श्री. राघवेंद्र कडकोळ व शिक्षक उपस्थित होते.

मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशामुळे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षणाचा हा उत्तम प्रत्यय असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.


शिरूर दर्शन

मुख्य संपादक : शिरूर दर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *