राजकीय

शिरुरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ऐश्वर्या पाचर्णे नगराध्यक्षपदी विजयी ; भाजपने घवघवीत यश मिळवत ११ नगरसेवक विजयी झाल्याने नगरपरिषदेत ठरला मोठा पक्ष


शिरुरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ऐश्वर्या पाचर्णे नगराध्यक्षपदी विजयी
भाजपने घवघवीत यश मिळवत ११ नगरसेवक विजयी झाल्याने नगरपरिषदेत ठरला मोठा पक्ष
शिरूर प्रतिनिधी :
शिरुर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) पक्षाच्या ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या तर नगरसेवकपदी भाजपने घवघवीत यश मिळवत ११,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ५ व अपक्ष १ असे बारा प्रभागातून २४ नगरसेवकपदी विजयी झाले असुन शिरूर नगरपरिषदेत भाजपचे सर्वात जास्त नगरसेवक निवडून आले असल्याने भाजप हा पक्ष नगरपरिषदेत मोठा पक्ष ठरला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) पक्षाचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक मुज्जपर कुरेशी,शिवसेना ( ठाकरे ) चे शहरप्रमुख माजी नगरसेवक संजय देशमुख,माजी नगरसेविका व राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार) चे शहराध्यक्ष शरद कालेवार यांच्या पत्नी मनीषा कालेवार,माजी नगरसेविका सुरेखा शितोळे,माजी नगरसेवक विनोद भालेराव,माजी नगरसेविका रेश्मा लोखंडे यांच्या सह अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.मागील कार्यकाळात नगरसेवक असलेले व यंदा निवडणुक लढवीत असलेले नितीन पाचर्णे व संगीता मल्लाव हे दोन  नगरसेवक विजयी झाले.
प्रमुख विजयी उमेदवारा मध्ये माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे,सागर नरवडे,संतोष थेऊरकर,पूजा पोटावळे,सुनील जाधव,उमेश शेळके,अमित कर्डीले विजयी झाले.
नगराध्यक्ष पदा करिता भाजपचा सुवर्णा लोळगे, राष्ट्रवादी कॉंग्रेस(अजित पवार) च्या ऐश्वर्या अभिजित पाचर्णे व राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार ) पक्षाच्या अलका खांडरे, शिवसेना ( शिंदे) च्या रोहिणी बनकर व अपक्ष उमेदवार म्हणून माजी नगराध्यक्षा वैशाली वाखारे या मैदानात होत्या.या निवडणुकीत ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांना ८७९९ इतकी मते मिळवत त्या विजयी झाल्या.तर अलका सुरेश खांडरे यांना ६८७४ मते मिळाली.भाजपच्या सुवर्णा लोळगे यांना  ६७४२ मते मिळाली.नगराध्यक्षपदासाठी पाच तर नगरसेवकपदासाठी २४ जागाकरीता ९८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.शिरूरची निवडणूक प्रथमच सर्व राजकीय पक्षांनी चिन्हावर लढविली.यंदाचा निवडणुकीत अनेकांनी ऐनवेळेस उमेदवारीसाठी इतर पक्षात पक्षांतर करून उमेदवारी मिळवली व त्यात काही जणांचे पक्षांतर यशस्वी झाले तर काहीना पक्ष बदलून पराभवास सामोरे जावे लागले.
दि.२ डिसेंबर रोजी मतदान झाल्यानंतर निकालासाठी १९ दिवसाची प्रतीक्षा करावी लागली. मत मोजणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अंदाजे दुपारी १२ वाजेपर्यंत नगराध्यक्षपदासह सर्व नगरसेवकपदाचा निकाल जाहीर झाला.
चौकट
ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे  ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष ) नगराध्यक्षपदी विजयी
नगरसेवकपदी विजयी उमेदवार  पुढील प्रमाणे
प्रभाग – 1 अ
संगिता महेंद्र मल्लाव ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष )
प्रभाग 1 ब
निलेश केरु गाडेकर ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष )
प्रभाग 2 अ
स्वप्नाली योगेश जामदार ( राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष )
प्रभाग 2 ब
एजाज अन्सार बागवान ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष )
प्रभाग 3 अ
सुनिल शंकर जाधव ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष )
प्रभाग 3 ब
आयेशा कलीम सय्यद ( अपक्ष )
प्रभाग ४ अ
सुनिता संतोष पोटे ( राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष )
प्रभाग ४ ब
नितीन मच्छिंद्र पाचर्णे ( भाजप )
प्रभाग ५ अ
सुनिता आनंद भुजबळ ( भाजप )
प्रभाग ५ ब
संतोष प्रभाकर थेऊरकर ( भाजप )
प्रभाग ६ अ
सुनिता पोपट कुरंदळे ( भाजप )
प्रभाग ६ ब
दिनेशकुमार विश्वनाथ मांडगे ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष )
प्रभाग ७ अ
सागर त्रिंबक नरवडे ( भाजप )
प्रभाग ७ ब
पुजा पुष्कराज पोटावळे ( भाजप )
प्रभाग ८ अ
चारूशिला गणेश कोळपकर ( राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष )
प्रभाग ८ ब
मितेश प्रदिप गादिया ( राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष )
प्रभाग ९ अ
रवी उर्फ शाम मनोहर ढोबळे ( राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष )
प्रभाग ९ ब
सविता सचिन राजापुरे ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष )
प्रभाग १० अ
स्वाती चेतन साठे ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष )
प्रभाग १० ब
निलेश संजय पवार ( भाजप )
प्रभाग ११ अ
स्वीटी दत्तराव शिंदे ( भाजप )
प्रभाग ११ ब
अमित संपतराव कर्डिले ( भाजप )
प्रभाग १२ अ
उमेश कैलास शेळके ( भाजप )
प्रभाग १२ ब
रिंकु राजेश जगताप ( भाजप )

शिरूर दर्शन

मुख्य संपादक : शिरूर दर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *