राजकीय

शिरूर शहराचा सर्वांगीण विकास करणार : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे


शिरूर शहराचा सर्वांगीण विकास करणार : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

शिरूर प्रतिनिधी
शिरूर शहराचा विकास आराखडा तयार करून सर्वांगीण विकास केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
शिरूर नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे उमेदवारांच्या प्रचारार्थ बावनकुळे शिरूर शहरात आले होते.
 शहरातील बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की हुडको कॉलनी संदर्भातील वर्ग दोनची प्रॉपर्टी वर्ग एक करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. हुडको कॉलनीचे पुढील काही महिन्यात प्रॉपर्टी कार्ड करण्याचा निर्णय करू असे सांगून गुजर मळा व स्टेट बँक कॉलनीतील खेळाच्या मैदानाचा असलेल्या आरक्षणा संदर्भातील प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही त्यांनी दिली.शिरूर
 नगरपालिकेची सत्ता भाजपा कडे आल्यास शिरूर शहराचे विविध प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे सांगून भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा लोळगे व नगरसेवक पदाच्या उमेदवाराना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी आमदार महेश लांडगे,पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष प्रदीप कंद,जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पलांडे,भाजप तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे,संपर्क प्रमुख धर्मेंद्र खांडरे,जिल्हा जनता दलाचे अध्यक्ष संजय बारवकर,नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा राजेंद्र लोळगे,भाजप शहराध्यक्ष नितीन पाचर्णे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा प्रिया बिरादार आदी उपस्थित होते.

शिरूर दर्शन

मुख्य संपादक : शिरूर दर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *