शिरुर शहराला विकासाचे मॉडेल करणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

शिरुर शहराला विकासाचे मॉडेल करणार : उपमुख्यमंत्री अजित पवार
शिरूर प्रतिनिधी
बारामतीच्या विकासाचे मॉडेल राज्यभर मांडले जाते.तसाच शहराचा कायापालट करण्यासाठी त्यादृष्टीने चौफेर व सर्वांगिण विकासासाठीचा डीपीआर तयार करून शिरुर शहराला देखील विकासाचे मॉडेल म्हणून उभे करण्याचा माझा निर्धार आहे अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
शिरूर नगर परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवार दि.२८ रोजी येथील पाच कंदील चौकात झालेल्या जाहीर सभेत पवार बोलत होते.
यावेळी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील,म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील,माजी आमदार पोपटराव गावडे व राहुल जगताप, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे,संचालक सुधीर फराटे, बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे,महेश ढमढेरे,श्रीनिवास घाडगे,शहराध्यक्ष शरद कालेवार यांसह उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे बोलताना म्हणाले,सर्व सामान्यांचा विकासासाठी सरकार काम करत आहे.सरकारने महिलांसाठी विविध योजना आणल्या आहेत.शिरूर शहर झपाट्याने मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.शिरूर शहरालगत कारेगाव,कर्डे,रांजणगाव,सुपा अशा अद्योगिक वसाहती विस्तारत आहेत.शिरूर शहर हे वाढत असल्याने वाढत्या शहरीकरणाचा वेग लक्षात घेऊन शहराचा विकास नियोजनबद्ध होणे गरजेचे आहे.शिरूर शहराचा कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जी काही मदत लागेल ती करण्याची तयारी असल्याचे सांगून क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.शिरूर शहराच्या हद्द वाढीचा प्रश्न सर्वांना विश्वासात घेऊन निकाली काढण्यात येईल.शिरूर शहर हे शैक्षणिक केंद्र कसे बनेल त्या दष्टीने काम करणार असून शिरूर नगर परिषदेच्या नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून दिला.

जर कोणी कायदा हातात घेत डिंग डॉंग करत असेल तर त्याला सोडणार नाही तो कोणीही मोठा असो आमच्या जवळचा असला तरी किंवा लांबचा असला तरी त्याला सोडणार नाही.आमच्याकडे सर्वाना समान न्याय असणार असल्याचा इशारा देत दहशत खपवून घेतली जाणार नाही असे ते म्हणाले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केंद्रात व राज्यात महायुतीत सत्तेत असून काम करून घेण्याची क्षमता आहे.प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस शिरूर नगर परिषदेला पक्षावर निवडणूक लढवीत असून शिरूर नगर परिषदेत आम्ही प्रकाश धारीवाल यांच्या शिरूर शहर विकास आघाडी बरोबर निवडणुकीस सामोरे जायचो यात मी कधीही हस्तक्षेप केला नाही काहीजण चुकीचे सांगतात की अजित पवार यांनी जास्त जागा राष्ट्रवादीला मागितल्या प्रकाश धारीवाल यांनी मला स्पष्टपणे सांगितले की माझ्या उद्योग व्यवसायामुळे मी निवडणुकीत नसणार आहे.त्या पार्श्वभूमीवर पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आमदार माऊली कटके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने सर्वसमावेशक पॅनल उभे केला.सुशिक्षित विकासाची जाण असलेले कार्यक्षम उमेदवार दिले आहेत या पॅनलच्या पाठीशी शिरूरकर जनतेने आपली ताकद उभी करावी असे म्हणुन नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे व नगरसेवकपदाच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
शिरूर शहरातील जनतेला सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासह शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असून विकास कामांना निधी
कमी पडुन देणार नसल्याची ग्वाही शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊलीआबा कटके यांनी दिली.
कमी पडुन देणार नसल्याची ग्वाही शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊलीआबा कटके यांनी दिली.
चौकट
नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ऐश्वर्या पाचर्णे म्हणाल्या की,शिरूर शहराला नवे रूप दिशा देण्याची वेळ आली असून माजी नगराध्यक्ष रसिकभाऊ धारिवाल व प्रकाशभाऊ धारीवाल यांनी शिरूर शहराच्या विकासाला वेगळी उंची व रूप दिले स्वर्गीय माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांनीही शिरूर शहराच्या विकासासाठी योगदान दिले.आता अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार माऊली आबांच्या नेतृत्वात शहराच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवीत असून शिरूरची जनता माझ्या पाठीशी उभी राहिल असा विश्वास नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ऐश्वर्या पाचर्णे यांनी व्यक्त केला.
चौकट
यावेळी माजी नगरसेवक विनोद भालेराव,निलेश लटांबळे,निलेश गाडेकर,विठ्ठल पवार,अभिजीत पाचर्णे आणि मनसेचे अविनाश घोगरे आदींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मुख्य संपादक : शिरूर दर्शन
