राजकीय

शिरूर नगरपरिषद निवडणूकीत एकुण ३२९९३ मतदारांपैकी एकुण २३४७२ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क सरासरी ७१.१४ टक्के मतदान


 

शिरूर प्रतिनिधी

शिरूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीकरीता एकूण ३२९९३ मतदारांपैकी झालेल्या मतदानात एकुण २३४७२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असुन सरासरी ७१.१४ टक्के मतदान झाल्याची माहीती निवडणुक निर्णय अधिकारी अभिजीत जगताप व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी प्रितम पाटील यांनी दिली.

या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या जागेसह २४ नगरसेवकपदासाठी निवडणूक घेण्यात आली.

एकून १२ प्रभागात झालेल्या या निवडणुकीसाठी   ३६ मतदान केंद्र तयार करण्यात आले होते.या मतदान केंद्रावर शहरातील सुमारे २३४७२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.सकाळच्या सत्रात मतदान केंद्रावरील गर्दी अपेक्षेपेक्षा कमी दिसत होती.परंतु दुपारी मतदान प्रक्रियेने वेग धरला सकाळी

७.30 ते ९.३० वाजेपर्यत एकूण -१५०७ टक्केवारी ४.५७ टक्के व सकाळी ११.३० पर्यंत एकुण ४३६४ टक्केवारी १३.२३ टक्के तर दुपारी १.३० पर्यंत ८५६२ टक्केवारी २५.९५ टक्के तर दुपारनंतर संध्या.५.३० पर्यंत एकुन २३४७२ टक्केवारी ७१.१४ टक्के मतदान मतदान झाले.

प्रसिद्ध उद्योगपती व शिरूर शहर विकास आघाडीचे नेते प्रकाश धारिवाल यांनी पत्नी दिना धारिवाल चिरंजीव आदित्य धारिवाल यांच्यासह शिरूर नगरपालिका मंगल कार्यालय येथील मतदान केंद्रावर मतदान केले.दरम्यान मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष वगळता कोणालाही मोबाईल फोन,कॅमेरा किंवा इतर उपकरणे वापरण्याची परवानगी नव्हती.आमदार माऊली कटके,माजी आमदार अशोक पवार,जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्षा जयश्री पलांडे,पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल बाबुराव पाचर्णे त्याखेरीज पोलीस अधिक्षक संदीपसिंग गिल, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आदीनी शहरातील विविध ठिकाणी भेटी दिल्या.निवडणुकीकरीता जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल,पोलीस उपविभागिय अधिकारी प्रशांत ढोले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे,रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड,पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्यासह ९० कर्मचारी मतदान बंदोबस्तासाठी नेमण्यात आले होते.राज्य राखीव पोलिस दलाच्या जवान तसेच गृहरक्षक दलाचे जवानही तैनात केले होते.त्यामुळे किरकोळ प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शहरात पुर्णपणे  शांततेत पार पडली.

नगरपरिषदेच्या झालेल्या या मतदान प्रक्रियेची मतमोजनी रविवार दि.२१ रोजी सकाळी १० वाजता नगरपरिषद कार्यालय येथे सुरू होणार असुन निवडणुकीतील सुमारे नगराध्यक्षपदाचे पाच उमेदवार व नगरसेवकपदासाठी निवडणुक लढविणा-या ९९ उमेदवारांचे भवितव्य या मतमोजनी नंतर उद्या घडणार आहे.

शिरूर दर्शन

मुख्य संपादक : शिरूर दर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *