शिरूर नगरपरिषद निवडणूकीत आव्वाज कोणाचा..?
शिरूर नगरपरिषद निवडणूकीत आव्वाज कोणाचा..?

शिरूर ( संतोष शिंदे )
शिरूर नगरपरिषद निवडणुकीचे मतदान पार पडलेे.सर्वत्र प्रचार,सभा,कार्यर्त्यांची धावपळ बंद झाली.आता वेध लागले ते निवडणुकीच्या निकालाचे.शिरूर नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाच्या खरमरीत चर्चा शहरत चाैका चाैकात,कट्ट्यावर घटलेल्या मतांचा टक्का कोणाला धक्का देणार.. शिरूर नगरपरिषदेत कमळ फुलणार..तुतारीचा आव्वाज होणार..घड्याळाचा गजर होणार..का.. बाण वेध घेणार ..! या चर्चा रंगत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
शिरूर शहर विकास आघाडीचे नेते व उद्योगपती प्रकाश धारिवाल यांनी व्यवसायाच्या व्यस्ततेमुळे वेळ देता येत नसल्याच्या कारणास्तव नरपरिषद निवडणूकीत पॅनल टाकणार नसल्याचे तसेच स्वतःही निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले होते त्यामुळे पहिल्यांदाच सर्व पक्षांनी पॅनल टाकून चिन्हावर निवडणूक लढविली आहे.शिरूर नगरपरिषदेचे निवडणुकीचे मतदान पार पडले असून मोजणी रविवार दि.२१ रोजी होणार असली तरी गल्ली गल्लीत कट्ट्या – कट्ट्यांवरील व हॉटेलात चहाचा आस्वाद घेताना गप्पांचा जोर जराही कमी झालेला दिसत नाही.सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या विजयाचा दावा करत गुलाल आम्हीच उधळणार म्हणत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
मतदान झाले निवडणुक संपली,आता कोण बाजी मारणार ? कोण हरणार ? कोणाला किती मताधिक्य मिळणार ? कोणत्या वार्डात कोण चालले ? किती टक्के मतदान झाले ? कोणाची सत्ता येणार ? या व अशा विविध चर्चा शहरासह चाैका-चाैकात रंगत असल्याचे पहावयास मिळत आहे.
मंगळवार दि.२ रोजी शिरूर नगरपरिषदेसाठी मतदान पार पडल्यानंतर ‘आव्वाज आमचाच’, ‘विजय आमचाच’,’गुलाल आम्हीच उधळणार’ असा ठाम विश्वास कार्यकर्ते व्यक्त करून दाखवत असुन सर्वच पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते कसा – कसा विजय होईल याचे गणित मांडत आम्हीच बाजी मारणार असल्याचा दावा सर्वांकडुन केला जात आहे.
शिरूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर उमेदवारांना प्रचारासाठी पुरेसा कालावधी मिळाल्याने आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रॅली,पदयात्रेतुन शहरातील मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी गाठी घेत सर्वांनीच प्रचारात रंगत आणली होती.त्यामुळे अक्षरश: शहरातील वातावरण ढवळुन निघाले होते.ऐन हिवाळ्यात शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे नागरीकांना पाहायला मिळाले.
सर्वांनीच मताधिक्य देण्याचा दावा केला असुन पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उमेदवारांना विजयी करण्यासाठी जोमाने कामाला लागल्याचे पहावयास मिळाले होते.मताधिक्य कोणाला मिळणार आणि विजयी कोण होणार यासाठी येणा-या २१ डिसेंबरच्या तारखेकडे शिरूर शहरातील जनतेचे लक्ष लागले आहे.

मुख्य संपादक : शिरूर दर्शन
